संस्थान

संत वाङ्मयाचा प्रचार व प्रसार व्हावा हे वाङ्मय मानवी जीवन आनंददायी करण्यासाठीचा राजमार्ग आहे म्हणून टाकळगव्हाण येथे श्री संत तुकाराम महाराज मंदिराची स्थापना २- नोव्हेंबर २००५ रोजी करण्यात आली.
श्री संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा संपूर्ण विश्वाला प्रेरना स्त्रोत म्हणून राहिली आहे. व भविष्यातही राहणार आहे. संत तुकोबाराय म्हणजेच वारकरी संप्रदायाचे पुर्णत्व आहे. संत बहिनाबार्इ म्हणतात “तुकाझालासे कळस” तुकाराम महाराज हे मराठी संस्कृतीला लाभलेले आदर्श संत होते ते म्हणतात.
“आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ।।”
त्यांची अनेक वचने म्हणींच्या किंव्हा वाक्प्रचाराच्या रूपाने जनसामान्यांच्या ह्रदय कमलावार विराजमान असल्याचा आपनास वेळोवेळी प्रत्यय येतो. सहज सुंदर काव्यात्मक भाषेत महाराज सर्वांना उपदेश करत त्यांचा उपदेश सर्वांचे कल्यान करणारा,सर्वानां आनांदानुभूती देणारा आहे. हा उपदेश सर्व सामान्य जनते पर्यंत यथार्थ स्वरूपात जावा हा हेतु ठेवून संत तुकाराम महाराज मंदिर टाकळगव्हाण ची स्थापना करण्यात आली आहे.

आमच्या संस्थानाकडून तुकोबारायांचे वाङ्मयीन दर्शन घडवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोज करण्यात येत असते.
संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या बीजे निमित्ताने भव्य गाथा पारायण सोहळ,रामकथा,समाज प्रबोधनपर किर्तन,व्याख्यान,प्रयोचनांचे आयोजन प्रतिवर्षी करण्या येते. प्रत्येक महीन्याला मासिक बीज ही साजरी करण्यात येत असते.
बीजे निमित्याने त्यांच्या अभंगाचे निरूपन करणरी किर्तने ठेवण्यात येतात. त्यांचे वांङमय सर्व सामान्यापर्यंत पोंहचण्यासाठी तुकोबाराय मुर्ती प्राणप्रतिष्ठेचे अवचित्य साधुन ४०९२ गाथा पारायण करणार्यानां मोफत वाटप करण्यात आल्या आहेत.
तुकोबारायांचा विचार किर्तनकार व प्रवचनकार महाराष्ट्रात व महाराष्ट्रा बाहेर करीतच असतात. त्याच बरोबर संत साहीत्याचे समिक्षक व अभ्यासक ही आपली कामे प्रामाणिक करतात. या सर्वांनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी संस्थानकडून “श्री संत जगद्गुरू तुकोबाराय जीवननिष्ठा पुरस्कार” दर वर्षी देण्यात येतो. संस्थान कडुन देण्यात येणा-या
या पुरस्काराला प्रथमत: स्वीकारून तुकाराम महाराजांचे वंशज व जेष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांनी आम्हाला कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी दिली याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो.
तुकोबारायांच्या जीवन व अभंगामध्ये अध्यात्म व व्यवहार यांचा समन्वय असल्याचे आपण पाहतो. धार्मिक तत्वांचे ,नियमांचे निरूपण करण्यासाठी तुकोबारायांचे अभंग उपयोगी पडतात. त्याच प्रमाणे ते अचुक नितीपरायण व्यवहाराचे
आचणाबाबतीत मार्गदर्शकही ठरतात. गाथा वाचल्यानंतर अभंगातील नैतीक उंची ही विलक्षण आहे. असा आपणास अनुभव येतो. महाराज लिहीतात “जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणेजो आपुले । ” महाराजांचा हा विचार अंगीकृत करून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. व भविष्यात त्यांचे विस्तारी करण करण्यात येणार आहे. या दृष्ठीने संस्थान कडून आरोग्य तपासणी,रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात येते.
संस्थान मध्ये राहणा-या विद्यार्थांना अध्यात्मीक शिक्षणाबरोबर शालेय शिक्षण देण्याचा संस्थानचा मानस आहे. वेदांचे शिक्षण देणा-या अनेक पाठशाळा आपण भारतभर पाहत आहोत “श्री तुकाराम महाराजांची गाथा म्हणजेच पंचमवेद आहे” ही भावना,श्रध्दा लक्षात घेवून संस्थानामध्ये “गाथा पाठशाळा ”सुरू करण्याचा संस्थानचा संकल्प आहे.
ज्या मुलांना, साधकांना गाथा कंठस्थ होर्इल त्यांना “गाथारत्न पुरस्कार ” देऊन सन्मानीत करण्यात येर्इल. तुकोबारायांनी महाराष्ट्रातील सामाजिक,अध्यात्मीक व राजकिय चळवळीचे भरण पोषण केले आहे. अनेक अभ्यासकांनी व समिक्षकांनी विविधांगी लिखान केले आहे. या सर्वांना निमंत्रीत करून परिषदा व चर्चासत्रांचे आयोजन करण्याचा संस्थानचा मानस आहे.
छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रामध्ये रयतेचे आदर्श राज्य , सर्वहितकारी राज्यांचे निर्माण केले. सर्व विश्वाला आदर्श वाटणारे राज्य हे राज्य निर्माणामध्ये महाराजांना प्रेरणा देणारे अलैकिक व्यक्तित्त्व महणजेच जगद्गुरू तुकोबाराय होय. ही सर्वांना स्स्फूर्तीप्रदान करणारी घटना आपल्या येणा-या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
“ आदर्श राजा व आदर्श संत” या रूपाने उभारण्याचा संस्थानचा मानस आहे.
या सर्व कार्यामध्ये आपल्या सुचना,मार्गदर्शन आम्हाला बळ देणा-या दिशा देणा-या ठरणार आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करतो.

Translate »